गेट क्रीएटिव विथ फोटोग्राफी
ऑनलाईन फोटोग्राफी कोर्से
सत्रे
आठवडे
भाषा
फीस
एक सुंदर प्रतिमा तयार करण्यासाठी काय आवश्यक असते? दृष्टी, कॅमेरा आणि त्याच्या हार्डवेअरचे ज्ञान, प्रकाश आणि त्याचे गुण ह्यांची समज, एक चित्रकथा तयार करण्यात-रंग आणि डिझाइन ह्यांची भूमिका: या सर्व पैलूंविषयीची आपली समज जितकी सखोल असेल तितकी, एक खरोखर सुंदर प्रतिमा निर्माण करण्याची आपली क्षमता असेल. हा ऑनलाईन फोटोग्राफी कोर्स आपल्याला फोटोग्राफीच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून एक चांगला आधार देईल, जो तुम्हाला तुमच्या आवडीचे क्षेत्र आहे त्यातील सुंदर फोटो घ्यायला मदत करेल. ते क्षेत्र, travel photography, landscape photography, people or portrait photography, street photography, wildlife photography, इत्यादी असू शकते.
तू काय शिकशील
एक्सपोशर
एका चांगल्या प्रतिमेला योग्य एक्सपोजर असणे आवश्यक असते, हे एखाद्या दिलेल्या परिस्थितीतील प्रकाशावर, विषय आणि तुमची वैयक्तिक सौंदर्य दृष्टी, ह्यावर आधारित आहे. पहिले सत्र तुम्हाला हे समजून घेण्यास मदत करेल कि तुम्हाला सर्वात उत्तम ठरणारे एक्सपोजर कसे मिळवायचे.
शटर
शटर स्पीड सर्जनशीलतेने कसे वापरायचे, मुद्दामच एखादी मोशन फ्रीझ किंवा ब्लर करून आपल्याला हवी तशी योग्य प्रतिमा तयार कशी करायची, हे समजून घेण्यासाठी ह्या सत्राची मदत होईल.
लेन्सेस आणि अपर्चर: भाग १
प्रतिमेमधील क्षेत्रफळ जे फोकसमध्ये आहे ते प्रतिमेचे दृश्य प्रभावित करेल. वेगवेगळ्या लेन्सेसच्या संयोगाने ऍपर्चर आपल्याला प्रतिमांच्या अनेक शक्यता देते, ज्यातून तुम्ही तुम्हाला हवी असलेली योग्य ती प्रतिमा निवडू शकता. हे सत्र तुम्हाला Depth of Field च्या जगात शोध घ्यायला मदत करेल.
लेन्सेस आणि अपर्चर: भाग २
झाकलेल्या दृश्याचा विस्तार, डावीकडून उजवीकडे आणि वरपासून खालपर्यंतचा भाग, हा लेंसद्वारे मिळालेला अँगल ऑफ व्यू आहे. पर्स्पेक्टिव हा फ्रेममधील समोरच्या, मधल्या आणि पार्श्वभूमीमधील पृष्ठभागाचा दृश्यास्पद संबंध आहे. फोटोग्राफीने सर्जनशील प्रतिमा घेण्यासाठी लेन्सची फोकल लेंग्थचा अँगल ऑफ व्यू आणि पर्स्पेक्टिव वर कसा परिणाम होतो ह्याची समाज असणे गरजेचे आहे.
कलर
एखाद्या प्रतिमेमध्ये रंगांची एक निश्चित भूमिका असते. एखादी कथा सांगण्यामध्ये हा एक मूलभूत घटक आहे. रंगांचे एकत्रीकरण, विरोधाभास आणि एका कथानकात रंग भरणे हे सर्व कसे होते ते जाणून घेणे हे एका फोटोग्राफरसाठी फार महत्त्वाचे शिक्षण आहे.
लाईट - भाग १
फोटोग्राफीमध्ये प्रकाश हे एक फार महत्वाचे अभ्यासाचे क्षेत्र आहे. प्रकाशाच्या सहा मुख्य गुणांना समजून घेणे आणि त्यातून आकारमान तयार करण्यात कशी मदत होते, पोत, स्वरुप आणि त्यास मूड कसा निर्माण करतात, ह्या फोटोग्राफीमधल्या मूलभूत पायऱ्या आहेत. ह्या सत्रामध्ये पहिली गुणवत्ता (क्वालिटी) शिकवण्यात येईल:Direction of Light (भाग 1).
लाईट - भाग २
या सत्रात प्रकाशाच्या पहिल्या गुणवत्तेवर आपली समज अधिक स्पष्ट होईल - Direction of Light (भाग 2).
लाईट - भाग ३
हार्डनेस, सॉफ्टनेस, इंटेन्सिटी, कॉन्ट्रास्ट: प्रकाशाच्या ह्या गुणवत्ता, आपण एखाद्या प्रतिमेत जो मूड तयार करता त्याला प्रभावित करतात. ह्या गोष्टी समजून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे आपल्याला फोटो घेण्याआधीच त्यातील चित्र आणि त्या चित्राचा मूड ह्यांची कल्पना करण्यास मदत होते. विषयावर आधारित आणि आपल्या सौंदर्यदृष्टीकोनाप्रमाणे, आपण या गुणांना आपल्या फायद्यासाठी वापरू शकता.
लाईट - भाग ४
एखाद्या विषयाच्या रंगाप्रमाणेच, प्रकाशाचा रंगाचासुद्धा त्या विषयावर आणि मूडवर प्रचंड प्रभाव पडतो. या सत्रात आपल्याला समजेल की नैसर्गिक तसेच कृत्रिम प्रकाशाच्या रंगाचा कसा वेगवेगळा परिणाम होतो.
कंपोसिशन
कंपोसिशन म्हणजे एखाद्या प्रतिमेतील विविध घटक तुम्ही कसे हाताळता! तुम्ही कोणत्या घटकांचा समावेश करायचा/कोणते काढून टाकायचे हे ठरविणे आणि या घटकांना इमेजमध्ये कसे ठेवायचे हे ठरविणे ह्यावर त्या प्रतिमेची कंपोझिशन निश्चित होते. या सत्रामध्ये तुम्हाला प्रतिमेसाठी चांगली कंपोसिशन कशी मिळवायची ह्यासाठी काही मार्गदर्शक तत्वे दिली जातील.
10कारणे ज्यामुळे LLA Online विशेष ठरते.
- इक्बाल मोहम्मद यांनी संरचीत केले: हा कार्यक्रम इकबाल मोहम्मद यांनी संरचीत केलेला आहे, एक प्रसिद्ध व्यावसायिक फोटोग्राफर, ज्यांनी भारतामध्ये प्रथमच व्यावसायिक फोटोग्राफी शिक्षणाची Litght and Life Academy ची स्थापना करून सुरुवात केली. ह्यामुळे LLA Online च्या अभ्यासक्रमाला तांत्रिक सखोलता आणि स्पष्टता मिळते.
- संरचित कार्यक्रम: येथील शिक्षण क्रमाक्रमाने होत असल्यामुळे प्रत्येक जण पद्धतशीर रित्या शिकत आहे ह्याची खात्री देता येते. LLA ऑनलाइन ह्याची खात्री देण्यास वचनबद्ध आहे. अशा प्रकारे सहभाग्यांची प्रगती होईल आणि ते आपली सर्जनशीलता व्यक्त करण्यास सक्षम बनतील.
- व्यावहारिक उपयोजन: ह्या कार्यक्रमात प्रत्येक सहभाग्याला थिअरीच्या व्यतिरिक्त प्रत्येक शिकवलेल्या पैलूवर एक असाईनमेंट दिली जाते, ज्यामध्ये एक फोटो शूट करून ती प्रतिमा पुनरावलोकनासाठी एका विशिष्ट कालावधीमध्ये पाठवायची असते. ह्यामुळे विषयाचा अधिक सखोल आणि बारकाईने अभ्यास होतो.
- मार्गदर्शक अभिप्राय: आमच्या माजी विद्यार्थ्यांचा संघ, जे व्यावसायिक फोटोग्राफरर्स आहेत, तुमच्या असाइनमेंटचे पुनरावलोकन करतील आणि तुम्हाला तुमच्या कामात सुधारणा करण्यासाठी मार्गदर्शन देऊन मदत करतील. विशेष म्हणजे ह्या कार्यक्रमाद्वारे तुमच्या वेगवेगळ्या असाइनमेंटचे मूल्यांकन, नेमणूक केलेल्या वेगवेगळ्या गुरूंकडून होऊ शकतं.
- पीअर ग्रुप पुनरावलोकन: प्रत्येक सहभाग्याला फोरमधील अन्य सहभाग्यांच्या कामाचे पुनरावलोकन करण्याची संधी देखील असते. या फोरमद्वारे एकमेकांशी प्रत्यक्ष संवाद साधता येईल, त्यातून बरेच शिकायला मिळेल आणि ते खूप प्रेरणादायकही असेल.
- एकाधिक भाषा: Oइंग्रजी व्यतिरिक्त नऊ भारतीय भाषामध्ये (बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओरिया, तामिळ, तेलगू) आहे. यामुळे सहभागी अशा भाषेत शिकतील जी त्यांना सर्वात सोयीची वाटेल.
- कठीण, अधिक सखोल शिक्षण, LLA द्वारे प्रेरणा: लाईट अँड लाईफ अकॅडेमीमध्ये फोटोग्राफीच्या शिक्षणासाठी आदर्श वर्गातील वातावरण सन्मानित केल्यानंतर १७ वर्षांनी, तेच शिक्षण, LLA ऑनलाईन द्वारे, ऑनलाईन देण्याचा प्रयत्न! गेट क्रीएटिव विथ फोटोग्राफी हा कोर्स फार कठीण आहे. वर्षानुवर्षे, आम्ही अनुभव घेतला आहे की जेव्हा एखादा सहभागी प्रत्येक आठवड्यात ह्या कोर्ससाठी वेळ देतो तेव्हाच त्याचे योग्य शिक्षण होऊ शकते.
- विविधतेसह अनुभव: अकॅडेमीद्वारे अभ्यासक्रमातून, व्यावसायिक फोटोग्राफर्सच्या ह्या संपूर्ण पिढीला ज्ञान देण्याच्या हेतूने स्वतःच्या अनुभवाच्या खाणीतून आलेले आहेत LLA ऑनलाईन ! यामुळे विविध पार्श्वभूमीतील सहभागींच्या गरजा अपेक्षीत करण्यात मदत होते.
- समाप्ती प्रमाणपत्र: जेव्हा तुम्ही आवश्यक ती सर्व असाइन्मेंट्स पूर्ण कराल, तसेच कोर्सच्या सर्व आवश्यकता पूर्ण केल्यावर, तुमच्या कामगिरीतील यशासाठी तुम्हाला प्रशस्तीपत्र देण्यात येईल.
- एलएलए ऑनलाईन क्लबची सदस्यता: प्रत्येक सहभाग्याला जेव्हा पूर्णत्वाचे सर्टिफिकेट दिले जाते तेव्हा तो आपोआपच एलएलए ऑनलाइन क्लबचा सदस्य होण्यासाठी पात्र ठरेल. ह्यामुळे तुम्हाला संपूर्ण LLA Onlineकुटुंबात प्रवेश मिळेल आणि आगामी अभ्यासक्रम/VLogबद्दल नियमित माहिती मिळेल.
कार्यक्रमाची मार्गदर्शिका:
तुम्ही कोणत्याही वेळी कार्यक्रमासाठी नावनोंदणी करू शकता. एकदा तुम्ही नावनोंदणी केल्यानंतर, तुम्ही नाव नोंदवल्यावर येणाऱ्या सोमवारपासून कार्यक्रम सुरु होईल. नावनोंदणीच्या वेळी, तुम्हाला LLA ऑनलाइनवर तुमच्या खात्यात ऍक्सेस क्रेडेन्शियल (user name and password) देण्यात येईल आणि तुम्हाला चर्चा आणि अभिप्रायासाठी एका ठराविक गटात(तुमच्यासह इतर सहभाग्यांच्या) प्रवेश दिला जाईल.
पहिल्या सोमवारी, तुमच्या नोंदणीनुसार, प्रथम सत्र LLA ऑनलाइन वर उपलब्ध केले जाईल. सामग्री, व्हिडिओ आणि/किंवा पीडीएफ आणि/किंवा मल्टीमीडिया सादरीकरणाच्या स्वरूपात असू शकते. सत्राच्या अभ्यासक्रमाच्या सामग्रीवर आधारित, तुम्हाला एक असाइनमेंट दिले जाईल. प्रत्येक असाइनमेंटसाठी तुम्ही एक प्रतिमांचा संच घेऊन तो पुढच्या रविवारी रात्री 11.59 पर्यंत ग्रुप फोरमवर अपलोड करणे आवश्यक आहे.
उदाहरणार्थ: जर तुम्ही सोमवार, 18 सप्टेंबरला अभ्यासक्रम सुरू केला तर तुम्हाला 23 सप्टेंबर (रविवार) या दिवशी 11:59 वाजता तुमच्या प्रतिमांचा संच अपलोड करणे आवश्यक आहे.
Iमहत्वाची सूचना: तुम्हाला प्रत्येक असाइन्मेंटसाठी फक्त एकच प्रतिमा अपलोड करता येईल. तुम्हाला तुमची सर्वात उत्कृष्ट प्रतिमा निवडून ती अपलोड करावी लागेल.
फोरम कसे कार्य करते :
1. तुम्ही शूट केलेली प्रतिमा, रविवार मध्यरात्रीपर्यंत तुमच्या असाइन्मेंटच्या शीर्षकाखाली तुम्ही केव्हाही अपलोड करू शकता.2. तुम्ही फोरमवर पोस्ट केलेल्या इतर प्रत्येकाची प्रतिमा पाहू शकता.
3. तुम्ही तुमच्या निवडीच्या इतर प्रतिमांना 1-5 स्टार्समधून, 5 सर्वोच्च म्हणून, रेट करू शकता.
4. फोरमवर तुम्ही निवडलेल्या कोणत्याही इमेजवर तुम्ही टिप्पणी देखील देऊ शकता.
5. तुम्ही फोरमच्या सदस्यांबरोबर चर्चा करण्यासाठी आणि LLA Online च्या टीमने उत्तर द्यावे म्हणून प्रश्न पोस्ट करू शकता.
6. तुम्हाला परत शूट करून जुन्या प्रतिमेच्या जागी, नवीन प्रतिमा, त्या असाइन्मेंटच्या डेडलाईनच्या आधी अपलोड करण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
7. मार्गदर्शक, तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतील आणि फोरमवरील गटास अभिप्राय देतील.
8. तुम्ही सादर केलेल्या कामाला दिलेली श्रेणी, त्यानंतरच्या बुधवारी पोस्ट केले जाईल.
महत्त्वाच्या टिपा:
* सर्व सामग्री 9 विविध भारतीय भाषा+ इंग्रजीमध्ये दिली जाईल.
* सर्व अभिप्राय, फोरम चर्चा आणि प्रश्न केवळ इंग्रजीत असतील.
मार्गदर्शकांच्या अभिप्रायाबाबत टीप:
मार्गदर्शक, संपूर्ण समूहाद्वारे पोस्ट केलेल्या प्रतिमांचे पुनरावलोकन करतील. ते एका ग्रुपसाठी, समालोचन करण्यासाठी, एक समान थीम ठरवतील आणि त्यानुसार अभिप्राय देतील. या व्यतिरिक्त हे मार्गदर्शक, या कोर्स संदर्भात फोरममध्ये विचारलेल्या शंकांचे निरसन करतील.
एकदा मार्गदर्शकांनी प्रतिमांचे मूल्यांकन केले की, त्यांचा अभिप्राय फोरमवर सादर केला जाईल. गटातील सर्व सदस्य प्रत्येक सहभाग्याचे असाइन्मेंटवरील काम पाहू शकतील. आमच्या अध्यापनशास्त्रातील एक मुख्य तत्व म्हणजे गटातील इतर सहभाग्याच्या कामापासून शिकण्यास प्रोत्साहन देणे. हे तुम्हाला, वैयक्तिकरित्या आणि एक गट म्हणून एकत्रितपणे, सुधारणा करण्यास मदत करते.
मार्गदर्शकांनी मूल्यांकन केल्यानंतर खालीलपैकी एक होईल:
a)मान्य असलेल्या सर्व प्रतिमांना उत्तीर्ण श्रेणी देण्यात येईल, ज्यामध्ये ग्रेड ए, बी किंवा सी (ए सर्वोच्च) असेल.
किंवा
b) तुम्ही सादर केलेल्या प्रतिमेला मार्गदर्शकांकडून मंजुरी दिली जाऊ शकत नाही (जर तुम्हाला आवश्यक असलेली किमान ग्रेड (C) दिली जाऊ शकत नाही, अशा बाबतीत, त्याला (RS) अशी ग्रेड दिली जाते. म्हणजे पुन्हा शूट (री - शूट).
गुरूचा अभिप्राय तुम्हाला पुन्हा शूट करण्याचे कारण देतो आणि पुढच्या वेळी योग्य प्रतिमा कशी मिळवायची ते सांगतो. या परिस्थितीत, तुम्हाला चालू असलेल्या असाइन्मेंटच्या विषयाच्या प्रतिमेसोबत, आधीच्या विषयाची नवीन प्रतिमा परत सादर करावी लागेल.
टीप: तुम्हाला प्रत्येक विषयासाठी केवळ एकच री-शूटची संधी देण्यात येईल. जर तुम्ही री-शूट नंतर पास झाला नाहीत तर, तुम्ही ऑनलाइन प्रोग्रामद्वारे प्रदान केलेल्या सर्व सुविधांचा आनंद घेऊ शकाल, परंतु तुम्हाला LLA ऑनलाईन कडून सर्टिफिकेट मिळणार नाही.
किंवा
c) जर तुमच्याकडून सादरीकरण झाले नाही, कोणत्याही कारणास्तव: तुमच्याकडे मुदत वाढवून मिळण्यासाठी विनंती करण्याचा पर्याय आहे, पण सादर न करण्यासाठी योग्य व पुरेसे कारण दिले जावे. ही विनंती प्रशासनास पाठविली जाते. तुम्ही सादर न करण्यासाठी जे कारण दिले आहे, त्यावर तुम्हाला मुदत वाढवून द्यावी कि नाही हा निर्णय घेतला जाईल आणि तो निर्णय तसेच हा कोर्स कसा सुरु ठेवायचा ते तुम्हाला कळवण्यात येईल.
प्रत्येक कार्यक्रमाच्या शेवटी तुम्ही जर प्रत्येक सत्राचे सर्व निकष उत्तीर्ण झाले असाल तर तुम्हाला एक प्रशस्तीपत्र देण्यात येईल.
PARTICIPANT’S GALLERY
TESTIMONIALS
INTERESTING FACTS
IN THE MAKING
OF PROFESSIONAL PHOTOGRAPHY EDUCATION
Learn Photography in Indian Languages
Get Creative with Photography is the first of its kind online photography course with a structured learning programme, developed in India, for photography enthusiasts across the world. Learn photography in Indian Languages ( Bengali, Gujarati, Hindi, Kannada, Malayalam, Marathi, Oriya, Tamil and Telugu) + English.