आमच्या विषयी

LLA ऑनलाईन एक असे व्यासपीठ आहे जिथे विद्यार्थी, एखाद्या रचनात्मक शिक्षण कार्यक्रमाद्वारे, आपली सर्जनशील बाजू पाहण्याची आणि शोधण्याची कला शिकू शकतात. प्रत्येक कोर्स लर्निंग मोड्यूल्सची एक श्रृंखला म्हणून सादर केला आहे, जो प्रगतिशील क्रमाने दिला आहे. हे लक्षात असावे की प्रत्येक मॉड्यूल, त्यानंतरच्या मॉड्यूलवर जाण्यापूर्वी, पूर्णपणे व्यवस्थित समजलेला असावा.

प्रत्येक मॉड्यूल व्हिडिओ लेसनच्या माध्यमातून सादर केला आहे. त्यानंतर एक असाईनमेंट आहे, ज्यामध्ये शिकलेल्या ज्ञानाचा सराव करणे आवश्यक असेल. LLA ऑनलाईन चे गुरू म्हणजेच मार्गदर्शक लाईट अॅण्ड लाइफ अकॅडेमीचे माजी विद्यार्थी. ते फोटोग्राफीच्या विविध क्षेत्रात कार्यरत व्यावसायिक आहेत. ते या संरचित, कालमर्यादित आणि रचनात्मक अभ्यासक्रमामध्ये पारंगत आहेत आणि म्हणूनच ते प्रत्येक सहभाग्याला ह्या कोर्समध्ये, त्याच्या असाईनमेंटवर अभिप्राय देऊन अधिक चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी प्रेरणा देऊन मागदर्शन करतील. शिक्षण आणि सर्जनशीलता ह्यांचा कायम उच्च दर्जा निश्चित करण्यासाठी असे केले जाईल.

LLA ऑनलाईन वर उपलब्ध असलेल्या प्रत्येक फोटोग्राफी कोर्समध्ये असाईनमेंट-कार्यपध्दत आहे, ह्यामध्ये एका असाईनमेंटमध्ये अपयशी ठरलेले, विद्यार्थी पुढील मॉड्यूलवर जाऊ शकत नाही / कोर्स पूर्ण करू शकत नाही. हे तत्त्व फोटोग्राफीच्या प्रत्येक पैलूचे संपूर्ण आणि सखोल ज्ञान मिळवण्याची खात्री देते.

इंग्लिशशिवाय हे कोर्सेस नऊ भारतीय भाषामध्ये आहेत (बंगाली, गुजराती, हिंदी, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडीया, तामिळ, तेलगू).

LLA ऑनलाईन ची कथा

ब्रुक्स इन्स्टिट्यूट, कॅलिफोर्निया, यूएसए येथे फोटोग्राफीची डिग्री घेतल्यावर आणि हॉलीवूडमधल्या काही मोठ्या विख्यात व्यावसायिक फोटोग्राफर्स बरोबर काम केल्यानंतर भारतात परत येणार्यांपैकी इक्बाल अहमद हि पहिलीच व्यक्ती होती. अशा अनेक संधी मिळाल्याबद्दल ते स्वतःला भाग्यवान समजतात.

इक्बाल ह्यांनी मुंबई आणि बंगलोर येथील जाहिरातीच्या जगात आपल्या कलेचा ठसा उमटवला आणि अनेक देशी- विदेशी गौरव-बहुमान त्यांनी मिळवले. अक्षरशः दररोज, महत्वाकांक्षी फोटोग्राफर्स,स्वतःचे फोटोग्राफीचे कौशल्य सुधारण्यासाठी इकबाल ह्यांच्या स्टुडिओमध्ये, त्यांचे मार्गदर्शन घेण्यासाठी येतात. त्यांनी दाखवलेल्या निष्कर्षामुळे इकबाल ह्यांच्या लक्षात आले कि भारतामध्ये व्यावसायिक फोटोग्राफी शिकवणारी एक संस्था असणे आवश्यक आहे. अनुराधा इकबाल ह्यांच्या सक्रिय सहकार्याने 2001 मध्ये, आपल्या देशातील प्रथम, संपूर्ण सुविधाजनक व्यावसायिक फोटोग्राफी संस्था Light and Life Academyची स्थापना झाली.

Light and Life Academy ने गेल्या १७ वर्षांमध्ये अशा अनेक प्रतिभावान व्यावसायिक फोटोग्राफेर्सची भर घातली आहे, ज्यांनी ह्या क्षेत्रामध्ये विविध देशीय आणि अंतर्देशीय पुरस्कार मिळवून स्वतःचे नाव कोरून ठेवले आहे.

www.llacademy.org आणि www.iqbalmohamed.com ला भेट द्या.

इक्बाल आणि अनुराधा या दोघांनीही देशभरातील वाढत्या संख्येतील इच्छुक फोटोग्राफेर्सपर्यंत पोहंचण्याचं स्वप्न साकार केलं. या दिशेने पहिला प्रयत्न पोर्ट्रेट अँड फंक्शन फोटोग्राफी या पुस्तकासह केला गेला, जे इंग्रजीशिवाय आठ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित झाले. ह्या प्रयत्नाचे खूप उत्साहाने स्वागत झाले आणि अशाच आणखी जास्त पुढाकारांची विनंती आम्हाला करण्यात आली.

लाईट अॅण्ड लाइफ अकॅडेमी मधील प्रशिक्षणाचा समृद्ध अनुभव आणि आता उपलब्ध असलेल्या तांत्रिक प्रगतीमुळे त्यांना वाटते कि फोटोग्राफीचे गुणवत्तापूर्ण शिक्षण ऑनलाईन फोटोग्राफीच्या माध्यमातून पोहोचण्याची हि अगदी योग्य वेळ आहे. फोटोग्राफीच्या शिक्षणासाठी कमी किंवा अजिबात प्रवेश नसेल अशा रसिकांनी,स्वतःची सर्जनशीलता व्यक्त करण्याची क्षमता सुधारण्यासाठी, त्यांच्याशी संबंधित असलेल्या फॉर्मद्वारे इथे प्रवेश घ्यावा, हाच LLA ऑनलाईन चा मनःपूर्वक हेतू आहे. ह्या कार्यक्रमाची रचना, ध्येयवादी असलेल्या इकबाल मोहम्मद यांनी केलेली आहे, ज्यांना फोटोग्राफीसंबंधी कोणतीही चांगली गोष्ट करण्याची नेहमीच उत्कट आवड आहे.

कोणती गोष्ट, LLA ऑनलाइन कार्यक्रम खरोखर विशेष बनविते,तर ते म्हणजे LLA च्या माजी विद्यार्थ्यांचा प्रचंड आणि उत्साहपूर्ण पाठिंबा. ज्यांनी केवळ कार्यक्रम एकत्रित करण्यास मदत केलेली नाही तर ते सहभाग्याना त्यांची सर्जनशीलता प्रस्तुत करण्यासाठी स्वतःच्या वैयक्तिक अनुभवांवरून ते मार्गदर्शन करणार आहेत.

LLA ऑनलाईन चे ध्येय आहे, सहभाग्याना त्यांच्या सर्जनशीलतेचा शोध घेणे, ती समृद्ध करणे आणि प्रस्तुत करणे ह्यासाठी एक प्लॅटफॉर्म आणि आवश्यक ते ज्ञान/माहिती/मार्गदर्शन देणे.

इक्बाल मोहम्मद

इक्बाल मोहम्मद

www.iqbalmohamed.com

इक्बाल मोहम्मद भारतातील आघाडीच्या जाहिरात फोटोग्राफर्सपैकी एक आहेत. ब्रूक्स इंस्टीट्युटच्या या माजी विद्यार्थ्याने इतिहास आणि राजकारणात,बॅचलर ऑफ आर्ट्सची पदवी, प्रसिद्ध लोयोला कॉलेज (चेन्नई) आणि मद्रास विद्यापीठातून, एमबीए केलेले आहे. फोटोग्राफरच्या कारकिर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रीय आणि बहुराष्ट्रीय ग्राहकांसाठी प्रसार योजना केल्या आहेत, ज्यात फोर्ड, टोयोटा, फिएट, ताज ग्रुप ऑफ हॉटेल्स, कलर प्लस, पॉन्ड्स, टीव्हीएस, टाईमॅक्स, रिबॉक, जीई, बीपीएल, कोका कोला, अशोक लेलँड, केर्न इंडिया, तामिळनाडू पर्यटन, इ. चा समावेश आहे. त्यांनी शासनासाठी तसेच एनजीओच्या अनेक सामाजिक जागरूकता मोहिमेवरही काम केले आहे.

इकलबल मोहम्मद यांचे "पोर्ट्रेट अँड फ़ंक्शन फोटोग्राफी" हे भारतातील आठ भारतीय भाषांमध्ये प्रकाशित होणारे पहिले पुस्तक आहे जे फोटोग्राफीचे शिक्षण जनतेपर्यंत पोहोचवते. 1000 वर्षांच्या तंजावुर मंदिराचे स्मरणार्थ असलेल्या त्यांच्या "व्हाईब्रेंट अ 1000" या पुस्तकाची खूप प्रशंसा झाली आहे. UNESCO World Heritage च्या दोन कॉफ़ी टेबलच्या पुस्तकांसाठी त्यांची छायाचित्रही आहेत - "नीलगिरिस माउंटन रेल्वे" आणि "चोला आर्किटेक्चर"हे त्यापैकी एक आहेत. फोटोग्राफीच्या जगात इक्बाल ह्यांना त्यांच्या कामामुळे खूप लोकप्रियता आहे. पुरस्कारांच्या रूपात मोठ्या प्रमाणात प्रशंसा मिळाली आहे. फोटोग्राफीच्या शिक्षणा मधील त्यांचे योगदान खूप कौतुकास्पद असून सन्मानित करण्यात आले आहे. अभिव्यक्ती आणि सर्जनशीलतेसाठी फोटोग्राफीचा उपयोग करणाऱ्या समाजाला प्रेरित करणे हे ह्यांचे ध्येय आहे.

अनुराधा इक्बाल

अनुराधा इक्बाल

अनुराधा इक्बाल ही LLA ऑनलाईन च्या मागे असणारी सर्जनशील शक्ती आहे. अनुराधा नियोजन आणि व्यवस्थापनाच्या प्रमुखपदी आहेत. एका दशकाचा अनुभव असलेल्या मार्केटिंग आणि ऍडव्हरटाईझींग च्या व्यावसायिक, अनुराधा यांनी, राष्ट्रीय/बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी नियोजन आणि सर्जनशील विभाग हाताळले आहेत आणि हे करताना पुरस्कारही मिळवले आहेत. लाईट अँड लाईफ अकॅडेमीच्या त्या सह-संस्थापक आहेत. मुंबई विद्यापीठातील वाणिज्य विषयातील पदवीधर आणि अर्थशात्रातील पदव्युत्तर पदवी त्यांनी मिळवली आहे. त्यांनी ऍडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगचा डिप्लोमा केला आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक व्यवस्थापन प्रशिक्षणाच्या कार्यक्रमांना त्या उपस्थित होत्या. अनुराधा पर्यावरण संरक्षण आणि सामाजिक जागरुकता कार्यक्रमांमध्ये समर्पितपणे सक्रिय आहेत. त्यांचे एक प्रेमळ स्वप्न आहे कि फोटोग्राफी या कलेमार्फत मुलांपर्यंत पोहोचून त्यांचे कलाजीवन समृद्ध करण्यास मदत करावी!

प्रल्हाद मुरलीधरन

प्रल्हाद मुरलीधरन

लोक कसे विचार करतात, ते एका विशिष्ट पद्धतीने का वागतात, समुदायात एकजूट का टिकते, विसंगती कशामुळे होतात, लोक कशामुळे एकत्र येतात आणि त्यांनी कोणती गोष्ट वेगळी करते? ह्या सर्व गोष्टी आकर्षक होत्या, आणि म्हणूनच प्रल्हादनी मानसशास्त्राचा अभ्यास करायचे ठरवले. व्यक्तींचा अभ्यास केल्यावर, वैद्यकीय मानसोपचार हा मुख्य विषय घेऊन सामाजिक कार्यात पोस्ट ग्रॅज्युएशन केले, आणि समुदायांकडे वळले. लोकांना सुसंवादाने एकत्र आणणे हे त्यांचे उद्दिष्ट बनले.

इकबालसोबत बराच काळ घालवल्यामुळे आलेला शिक्षणाचा अनुभव आणि वेगवेगळ्या फोटोग्राफर्सकडून फोटो काढण्यासाठी मिळालेले मार्गदर्शन, शाळेच्या आणि कॉलेजच्या मुलांसाठी घेतलेल्या फोटोग्राफीच्या वर्कशॉपच्यावेळी इकबालसोबत मदतीसाठी काम करताना, प्रल्हादना कळले कि एक फोटोग्राफ, संवादामध्ये असणारे सर्व अडथळे सहजपणे दूर करू शकतो.

तिथूनच एक कल्पना विकसित झाली आणि प्रल्हाद, इकबाल आणि अनुराधा एकत्र आले, बघायला कि फोटोग्राफर्स फोटोग्राफीचा उपयोग स्वतःला व्यक्त करण्यासाठी कसे करू शकतात आणि त्याचवेळी सगळ्यांना आनंद देण्यासाठी कलात्मक पातळीवर कसे जोडता येऊ शकते.

आशा आहे कि LLA ऑनलाईन फोटोग्राफी एडुकेशन प्रोग्राम, हे उद्दिष्ट साध्य करेल.

लाइट अॅण्ड लाइफ अकॅडेमीचा फोटोग्राफी प्रोग्राम आणि फोटोग्राफीवरील पोर्ट्रेट व फंक्शन फोटोग्राफी हे भारतातील 8 भाषांमधील पहिले पुस्तक, यासारखाच एलएलए ऑनलाइन फोटोग्राफी प्रोग्राम हा एक अग्रणी प्रयत्न आहे.