मार्गदर्शक

Every Mentor of the LLA Online program has graduated with a Post Graduate Diploma in Professional Photography from Light and Life Academy, having undergone incredibly rigorous training. They are currently practicing their art across India and come from varied backgrounds & cultures, wielding a treasure of aesthetic sensibilities. There will be consistency in terms of feedback given since everyone graduated from the same technical and artistic training at LLA.

Ajit SN

Ajit SN ने बहुराष्ट्रीय रिटेल कंपनीत काम केले. जरी त्याला नोकरी आवडली होती, तरीही बालपणापासून त्याच्या खोलीत रिग्ज, गॅझेट्स, बाईक आणि कारचे अनेक पोस्टर होती, त्यांनी त्याला फोटोग्राफीकडे आकर्षित केले. भरपूर संशोधन केल्यानंतर, त्याने LLA मध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला.

अजितचे सर्व काही अचानकच घडलं: जसा त्याचा कॉर्पोरेट जगातून बाहेर पडून व्यावसायिक फोटोग्राफर होण्याचा निर्णय. उत्स्फुर्ततेने त्याच्या कृतीवर नियंत्रण केले. जेव्हा तो पहिल्यांदा डायविंगला गेला तेव्हा त्याला इतका उत्साह होता कि डायविंगचा विचार सोडून त्याने पाण्याखालील फोटोग्राफी उपकरणांवर बराच पैसा खर्च केला आणि तो एक प्रयत्न केला. आता, तो एक प्रमाणित डाइव्हर आहे, जगभरात प्रवास करून पाण्याच्या पृष्ठभागाच्या खालील जीवन आपल्या फोटोग्राफीत साठवून ठेवतो. तो आता एक प्रदर्शन भरवण्याचा विचार करतोय ज्यामध्ये त्याच्या अंडरवॉटर फोटोंचा प्रचंड संग्रह प्रदर्शित करेल. जेव्हा तो पृष्ठभागावर येतो तेव्हा तो ऑटोमोबाइल आणि जीवनशैली उत्पादनांची चित्रे घेतो.

अजित हा LLA कुटुंबाचा अविभाज्य भाग आहे. फोटोग्राफीसाठी त्याची आवड LLA मध्ये गौरवली गेली. एका हौशी व्यक्तीला फोटोग्राफीतील चूक आणि बरोबर काय ते सांगणे आणि फोटोग्राफीच्या शिक्षणाचा प्रसार करणे हीच त्याची आवड आहे. त्याला असे पण वाटते कि LLA ऑनलाईन हे एक असे व्यासपीठ आहे जिथे मार्गदर्शक आणि विद्यार्थी ह्यांच्यामध्ये समप्रमाणात देवाण-घेवाण होईल. त्याच्यासाठी, विद्यार्थ्याकडून शिकणे हे त्याच्याकडून शिकत असलेल्या विद्यार्थ्यांप्रमाणेच महत्त्वाचे आहे.

Akshay Sharma

अक्षय शर्मा, न्यू दिल्ली, भारतात राहणारे एक फोटोग्राफर आहेत. कॉर्पोरेट इन्क. मध्ये मॅनेजमेंट कंसल्टंट,मार्केटिंग अँड ऍडव्हर्टायझिंग क्षेत्रात,जवळजवळ पाच वर्षे खर्च केल्यानंतर अक्षय यांनी 2015 साली Light & Life Academyमध्ये एक वर्षाचा फोटोग्राफीचा कोर्स करायचा ठरवले.

व्यावसायिकदृष्ट्या, ते लाइफस्टाइल स्पेस या ब्रँडचे पार्टनर आहेत जी,(फॅशन, आर्किटेक्चर आणि इंटिरियर, लक्झरी स्टील लाईफ) या ब्रॅण्डची कथा सांगणाऱ्या व्हिज्युअल इमेजरी तयार करते. पण व्यक्तिशः त्यांना वास्तूंच्या, क्षणभंगुर घटनांच्या किंवा ब्रह्माण्डाच्या लुब्ध करणाऱ्या तस्विरीना आणि नाजूक कलाकृतींना जमवायला आवडतं. अक्षय, भौगोलिक-राजकीय घडामोडी, विज्ञान-तंत्रज्ञान मधील प्रगती, मानवाधिकार आणि व्यक्ती स्वातंत्र्य या विषयांचे निरीक्षक आहेत; जे त्यांच्या तत्वज्ञान, मानसशास्त्र, निसर्ग आणि स्वतंत्र संगीत आणि कलेमध्ये असणाऱ्या आवडीमुळे उद्भवते.

LLA ऑनलाईन चा एक मार्गदर्शक म्हणून भाग असल्यामुळे, अक्षय त्यांची आयुष्यातील प्रशिक्षण आणि संरचीत शिक्षणाची आवडती इच्छा पूर्ण करू शकतात. ते खूप उत्साही आहेत कि ते अशा एका कार्यक्रमाचे भाग आहेत जो फोटोग्राफीच्या लोकशाहीकरणात भर घालतो, अभिव्यक्ती आणि चौकशी ह्या दोन्हींच्या माध्यमातून!

Akshya

Akshaya Vaidyanathan

यांच्या कुटुंबातील सदस्य आपल्या रोजच्या व्यवसायाव्यतिरिक्त अनेक आवडीहि सहज जोपासत असत त्यामुळे अक्षयासाठी प्रेरणांची कमी नव्हती. त्यांचे वडील एक एचआर व्यावसायिक तसेच एक उत्कट अभिनेता आहेत. त्यांच्या खुप लवकर लक्षात आले कि अभिनयामुळेच वडील जास्त आनंदी आहेत. मग त्यांनीसुद्धा त्यांच्याच पाऊलावर पाऊल ठेवून आपल्या आवडीच्या क्षेत्रात सर्जनशीलतेला वाव देणारे सिनेमॅटोग्राफी आणि फोटोग्राफी निवडली. त्यांनी इलॉक्ट्रॉनिक माध्यमात पदवी अभ्यासक्रम पूर्ण केले. त्या कधीच एक पुस्तकी किडा नव्हत्या. त्यांना स्वतः करून बघायची कार्ये आवडत. कॉलेजच्या दुस-या वर्षात त्यांचा फोटोग्राफीशी परिचय झाला आणि मग त्यांनी मागे वळून पहिले नाही. सुरुवातीला त्या सिनिमॅटोग्राफीच्या फॅन होत्या. लोकांमधील अतिमहत्त्वाच्या क्षणांना टिपून घेऊन त्यांच्या मूळ भावना शोधणे ह्या छंदामुळेच त्यांना फोटोग्राफीकडे वळणे भाग पाडले आणि आता त्या पूर्णवेळ फोटोग्राफी करतात. त्यांच्यासाठी फोटोग्राफी हा फक्त छंद नव्हता. त्या एक व्यावसायिक फोटोग्राफर बनू इच्छित होत्या.

एलएलएमधील व्यावसायिक फोटोग्राफीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल्यानंतर, त्या आता चेन्नईमध्ये त्यांच्या कलेचा अभ्यास करतात, मुख्यतः फॅशन आणि फूड फोटोग्राफीवर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या फॅशन फोटोग्राफीद्वारे त्या काही खास संदेश आणि कथा देतात ज्यामुळे त्या लोकांशी अधिकच जोडल्या जातात. त्यांचे अन्नपदार्थांची रचना, मांडणी आणि अन्नपदार्थाबद्दलचे प्रेम त्यांना फूड फोटोग्राफीकडे आकर्षित करते.

अक्षया म्हणतात की फोटोग्राफीने त्यांना एक नवीन जीवन दिले आहे, नवीन आउटलेट, जिथे प्रत्येक दिवस उत्साहाने भरला आहे. आजपर्यंत सकाळी उठल्यावर एकदाही त्या म्हणाल्या नाहीत “अरे देवा! आज मला कामावर जाण्याची गरज आहे.” LLA ऑनलाईन मध्ये सामील होण्याचा त्यांचा उद्देश अगदी सोपा आहे, त्यांना हि कला, ज्यामुळे त्यांचे जगच बदलले, शक्य तितक्या जास्त लोकांमध्ये वाटायची आहे.

Ankit Gupta

Ankit Gupta

अंकित गुप्ता दिल्लीत लहानाचे मोठे झाले. क्रिकेटचे मोठे चाहते, जेव्हा जेव्हा संधी मिळाली ते क्रिकेट खेळले आणि टेबल टेनिस व बॅडमिंटनचा सुद्धा तितकाच आनंद घेतला. त्यावेळी त्यांच्या सभोवती असलेल्या प्रत्येकाप्रमाणे अंकित यांच्यासमोर पण शाळेनंतर दोन मार्ग होते, इंजिनिअर होणे किंवा डॉक्टर होणे. अंकितने पहिला पर्याय निवडून इंजिनिअरिंग मध्ये पदवी मिळवली, कॉलेजनंतर सरळ त्यांना इन्फोसिसमध्ये घेण्यात आले आणि ते म्हैसूरला आले. त्यांच्या आईने म्हैसूरला जाण्यापूर्वी त्यांना डीएसएलआर भेट दिला. अंकित यांची ही सुरुवात होती. त्यांनी परदेशात एमबीए पूर्ण करण्याच्या महत्वाकांक्षेने 4 वर्षे इन्फोसिसमध्ये काम केले.

हे सर्व बदलले जेव्हा अंकितने घरमालकाशी संभाषण केले. तेव्हा ते मैसूरमध्ये रहात होते. ती एक वृद्ध महिला होती जी एकटीच राहत होती आणि तिची मुले परदेशात होती. अंकित लवकरच ह्याच मार्गाचे अनुसरण करणार होते, त्यामुळे त्यांना हे जाणून घ्यायचे होते कि त्यांची मुले त्यांना भेटण्यासाठी किती वेळा येत असत. जेव्हा त्यांनी सांगितले कि मुले भेटून पाच वर्षे झाली, तेव्हा अंकितनी त्यांचा प्लॅन पूर्णपणे बदलला आणि त्यांनी भारतात राहण्याचा आणि आपल्या कुटुंबाच्या जवळ राहण्याचा निर्णय घेतला. त्यांनी इन्फोसिस सोडले आणि दिल्लीला परत गेले. आपल्या वडिलांच्या व्यवसायात सामील होण्याचा पर्याय योग्य नव्हता हे लक्षात घेऊन ते लगेच फोटोग्राफीकडे वळले. आपल्या मित्रांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या त्यांच्या फोटोग्राफीमधील गुणवत्तेविषयी सतत उत्तेजन मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला. त्यांना एक सकाळ अगदी स्पष्ट आठवते,जेव्हा ते एका दरीत उभे होते, सभोवताली काश्मीरचे डोंगर पसरलेले होते, जिथे त्यांना त्यांच्या फोटोग्राफीच्या उत्कट आवडीची खात्री पटली. कारण त्यावेळी त्यांच्या मनात फक्त एकाच विचार होता तो म्हणजे ह्या क्षणांना टिपून घेऊन अनंत काळापर्यंत जतन करायचे. थोडा विचार केल्यानंतर, बॅग पॅक करून, ते एलएलए ला आले आणि व्यावसायिक फोटोग्राफीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले. प्रवास, निसर्ग, आर्किटेक्चर आणि इंटेरिअर फोटोग्राफी हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

समाजाची परतफेड अंकितच्या अजेंड्यावर प्रथम क्रमांकावर आहे. LLA ऑनलाईन च्या माध्यमातून, त्याना एक व्यासपीठ मिळणार आहे, त्यांचे फोटोग्राफीचे ज्ञान लोकांना देण्यासाठी, ज्यांना फोटोग्राफीबद्दल उत्कट प्रेम आहे.

Arnab Nath

Arnab Nath

अर्नबना फोटोग्राफी करण्याची पहिली प्रेरणा मिळाली ती त्यांच्या वडिलांकडून जे स्वतः एक फोटोग्राफर होते. अगदी लहानपणापासून अर्णबनी आपल्या वडिलांना वेगवेगळ्या साधनांसोबत प्रयोग करताना व जमशेदपूरमध्ये एक लॅब स्थापन करताना पाहिले, ती त्यावेळची प्रदर्शनात ठेवायच्या प्रतिमांची प्रिंट करण्याची जागा होती. हि ती जागा होती जिथे अर्णबना फोटोग्राफीमधील वेगवेगळ्या व्यक्तींशी परिचय करून घेण्याची संधी मिळाली.

अर्णब अगदी तिसऱ्या इयत्तेत असल्यापासून फोटो काढू लागले आणि सर्व कौटुंबिक कार्यांचे एक नियुक्त केलेले फोटोग्राफर बनले.

अर्णबनी पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजला बी. ए. सायन्स केले,मास कम्युनिकेशन आणि फिजिक्स हे त्यांचे विशेष विषय होते: हा एकच कोर्स असा होता ज्यामध्ये फोटोग्राफी हा एक अभ्यासाचा विषय होता. हे त्यांच्या आयुष्यातील असे वळण होते जिथे फोटोग्राफीचे कुतूहल एक उत्कट प्रेम बनले आणि त्यांनी ह्या गोष्टीचा मनःपूर्वक पाठपुरावा करण्याचा निर्णय घेतला.

अर्णब लाइट अॅण्ड लाइफ अकॅडमीत सामील झाले आणि 2003 साली त्यांनी प्रोफेशनल फोटोग्राफ़ीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा पूर्ण केला.

प्रॉडक्ट्स, ऑटोमोबाईल आणि पोर्ट्रेट हे त्यांचे क्षेत्र आहे. 2008 पासून ते LLA मध्ये प्राध्यापक आहेत. ते वैयक्तिक प्रकल्पांसाठी त्यांचा भरपूर वेळ देतात त्यामुळे सतत एका फोटोग्राफर म्हणून विकसित आणि प्रगती होण्यासाठी त्यांना मदत होते. त्यातील काही म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे पर्यटन, कुंभमेळ्याचे व्हिजुअल रिप्रेझेंटेशन, मथुरा येथे होळीचे उत्सव आणि पुष्कर उत्सवाचे शूटिंग इ.

अर्णब यांचे असे मत आहे अधिक लोकांनी फोटोग्राफी शिकावी आणि एक कला म्हणून तिला दाद द्यावी.अर्णब यांचे असे मत आहे अधिक लोकांनी फोटोग्राफी शिकावी आणि एक कला म्हणून तिला दाद द्यावी.

देशामध्ये फोटोग्राफीने स्वतःच प्रगती करणे हे महत्त्वाचे आहे. LLA ऑनलाइन मुळे हे साध्य होईल असा त्यांना विश्वास आहे, विशेषत: हा कोर्स विविध भाषांमध्ये असल्यामुळे. अर्णब संपूर्ण भारतभर फोटोग्राफी शिक्षणाचा प्रसार करण्याचा एक भाग होऊ इच्छित आहेत आणि म्हणूनच ते एलएलए ऑनलाईनचे मार्गदर्शक आहेत.

Garima Chaudhary

गरिमा यांची कलेतील रुची आठव्या इयत्तेत सुरु झाली. तेव्हापासून त्या भारतात कलाविषयक अभ्यासक्रम आणि महाविद्यालये शोधत होत्या. बारावीच्या परीक्षेनंतर त्यांनी नागरी सेवेचा मार्ग स्वीकारला इतिहासाचा अभ्यास केला. त्यांना चांगले यश मिळाले पण काहीतरी उणीव जाणवली.

त्या फक्त चांगल्या गुणांमुळे आनंदी नव्हत्या. त्यांना आणखी काहीतरी हवे होते. त्यानंतर पालकांना न कळवता त्यांनी एका आर्टस् कोर्सला अर्ज केला आणि त्यांची तिथे निवड झाली. आई-वडिलांना विश्वासात घेतल्यानंतर त्यांनी तो कोर्स सुरु केला आणि सर्वात प्रथम त्यांचा फोटोग्राफीशी परिचय झाला. व्हिव्हिटरच्या सहाय्याने फोटोग्राफर म्हणून त्यांचा प्रवास सुरू झाला. त्यांनी व्हिज्यूअलायझर म्हणून काम केले आणि डिजिटल मीडियामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशनचा पाठपुरावा केला, अॅनिमेशन त्यांचा विशेष विषय होता. त्या सतत आपल्या आई-वडीलांशी झुंज देत होत्या. अखेरीस त्यांना खात्री पटली की आर्टस् या क्षेत्रात सुद्धा चांगले करिअर होईल ज्यामुळे त्याची मुलगी आनंदात राहील आणि आर्थिकदृष्ट्या स्थिरही.

आपल्या पतीवर स्वतःच्या सर्जनशीलतेने आणि फोटोग्राफीने छाप पाडल्यावर त्यांनी तिला एक DSLR भेट म्हणून दिला. त्यानंतर त्यांनी एलएलएमध्ये अर्ज केला आणि प्रोफेशनल फोटोग्राफीमध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले.

गरिमा ह्यांनी 2011 मध्ये विविध ई-कॉमर्सच्या साइट्ससाठी फोटोग्राफी असाइनमेंट घेऊन त्यात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यांनी 2011मध्ये आपला पहिला स्टुडिओ सुरु केला आणि बरेच फ्रिलान्स काम केले. त्यावेळी अप्लाइड आर्ट आणि फोटोग्राफीचे ज्ञान वापरून स्वतःची अशी एक शैली निर्माण केली. त्या आता बंगलोरमध्ये स्थायिक आहे आणि एक कला- दिग्दर्शक, ग्राफिक डिझायनर, चित्रकार, फोटोग्राफर आणि ब्लॉगर आहे.

गरिमा यांना दृढपणे असे वाटते कि फोटोग्राफी हि कला जनतेसाठी आहे. LLA ऑनलाईन चा विविध भाषांमधून जनतेपर्यंत पोहोचण्याचा हा प्रयत्न त्यांना खूप कौतुकास्पद वाटतो आहे. LLA ऑनलाइन बद्दल त्यासुद्धा आमच्या इतक्याच उत्सुक आहेत.

Kavitha Swaminathan

तिरूपूरमधील एका प्रभावशाली आणि सधन कुटुंबातील कविता शाळेतच भरपूर प्रमाणात पॉकेटमनी घेऊन आली. लवकरच तिला कळले कि तिची एकमेव आवडीची गोष्ट म्हणजे – चॉकलेट्स. हि तिची सर्वात दीर्घकाळ टिकलेली आवड होती. अगदी आजही, कविता चॉकोलेटचा संपूर्ण बार काही सेकंदात खाऊ शकते, आणि त्याचवेळी चॉकलेटच्या आणखी एका तुकड्याच्या शोधात असते. शाळेमध्ये ती व्यवस्थित लक्ष द्यायची आणि फक्त तिला आवडणाऱ्या विषयांमध्ये- भौतिकशास्त्र, झुऑलॉजी आणि वनस्पतिशास्त्र, ती उत्तम रीतीने पास व्हायची,डॉक्टर बनण्याच्या हेतूने! डॉक्टरेटच्या कोर्ससाठी कॉलेजला एक आठवडा गेल्यावर त्यांना समजले कि त्या हा कोर्स पूर्ण करू शकत नाही आणि त्यांनी तो सोडला. त्यानंतर त्यांनी बी.कॉम अभ्यासक्रमासाठी अर्ज केला पण खूप उशीर झाला होता आणि सर्व महाविद्यालयांनी प्रवेश देणे बंद केले होते. कविता म्हणतात की आता मागे वळून पाहताना वाटते कि जे काही होतं ते बऱ्यासाठी होतं! फार काही पर्याय उरले नसल्याने त्यांनी महाराज कॉलेज, पेरुंडुराई येथे व्हिज्युअल कम्युनिकेशन कोर्समध्ये प्रवेश घेतला. एक Pentax K 100, एक गडद खोली आणि मनाच्या कोप-यात शोधण्याचे स्वातंत्र्य असलेल्या कविताला फोटोग्राफीची शक्ती समजली. या कॉलेजमध्ये जवळजवळ 1500 विध्यार्थी होते पण व्हिजुअल कम्युनिकेशनच्या ह्या सहा विध्यार्थ्यांना सर्वात जास्त मागणी होती. शेवटी, कोण स्वतःची एक चांगली प्रतिमा इच्छित नाही? फोटोग्राफीने त्यांच्या सर्व भावना जागृत केल्या आहेत, कविता म्हणतात. फोटो काढताना त्या कुत्र्याच्या वेदना समजून घेऊ शकत होत्या, जवळून आलेली हवेची झुळूक त्यांना जाणवत होती आणि फुलांचे व आकाशातील रंग बघून त्या आश्चर्यचकित झाल्या होत्या. त्यांच्या सभोवतालचे जग अमर्याद सौंदर्यांच्या विशाल रूपात परिवर्तित झाले होते, शेवटी सर्व गोष्टी जुळून यायला लागल्या, त्यांच्या फोटोग्राफीच्या माध्यमातून जगाला अर्थ प्राप्त झाला, आणि कविताना समजले कि इथून पुढे आयुष्यभर त्या एक फोटोग्राफर म्हणून जगणार होत्या.

त्यांनी 2002 मध्ये LLA मध्ये प्रवेश घेतला, जिथे त्यांना खात्री पटली कि रोजचा दिवस हा एक साक्षात्कार आहे. कोर्स संपल्यानंतरसुद्धा, जेव्हा त्या इतर व्यावसायिक फोटोग्राफरची कामे बघायच्या तेव्हा त्यांना वाटायचे कि एक फोटोग्राफर म्हणून त्यांची वाढ होणे आवश्यक आहे. त्यांनी मनाशी ठरवले कि त्या आजीवन एक विध्यार्थी म्हणून जगतील, ज्ञानाबद्दलची सततची तहान भागवत आणि फोटोग्राफर म्हणून प्रगती करण्याची त्यांची गरज म्हणून! सध्या त्या Light & Life Academy मध्ये पूर्णवेळ काम करतात, कॉलेजच्या शैक्षणिक मानदंडाची देखरेख करतात त्याचप्रमाणे ऊटीमधील लोक, ठिकाणे आणि आठवणींना कॅमेऱ्याने टिपण्यासाठी प्रकाशाचा पाठलाग करतात. विद्यार्थ्याच्या प्रत्येक विषयावर सखोल ज्ञान देताना त्या दररोज विद्यार्थ्याकडून शिकत राहतात. फोटोग्राफीचे सखोल ज्ञान मिळवण्यासाठी नवीन सर्जनशील व्यक्तींना भेटण्याचा उत्तेजन त्यांना अफाट समाधान देते. त्या म्हणतात, LLA ऑनलाईन त्यांना विशेष प्रिय आहे कारण हा कोर्स नऊ वेगवेगळ्या भारतीय भाषांमध्ये उपलब्ध असेल, ज्यामुळे अनेक महत्वाकांक्षी फोटोग्राफर्सना फोटोग्राफी जाणून घेण्यासाठी प्रेरणा मिळेल.

Khushboo Agarwal

आयुष्यात मागे वळून पाहताना, मला खूप छान वाटते कि माझ्या वडिलांनी अतिशय धाडस करून कलकत्ताचे आरामशीर आयुष्य सोडून ते चेन्नईत आले, स्वतःचा व्यवसाय सुरु करण्यासाठी. याचा अर्थ असा होतो की मला दोन्ही जगातील सर्वोत्तम गोष्टी मिळाल्या : उत्तर भारताच्या प्रथांचा आधार आणि त्याचवेळी एक सुंदर धागा जो मला सर्व तामिळ गोष्टींशी जोडत होता:लोक, अन्न,संस्कृती आणि हे स्थान. ते म्हणतात ना, विविधता हा जीवनाचा मसाला आहे!

शाळेत मी नृत्य, नाट्य, वादविवाद इत्यादींमध्ये भाग घ्यायचे आणि जरी गायनामध्ये एवढी चांगली नव्हते तरी शाळेच्या कॉयर पर्यंत मजल गाठली होती. परंतु अभ्यासातील वर्गात अव्वल स्थान हि माझी प्राथमिकता होती. दहावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्व काही बदलले आणि मी फक्त शाळेत 5 वी येऊ शकले. माझा आत्मविश्वास डगमगला. ती विचार करायची वेळ होती. मी ठरवले कि पुढील दोन वर्षे जास्त ताण घ्यायचा नाही. जी गोष्ट मला आवडते ती मी करू लागले, नृत्य! आणि गम्मत म्हणजे मला बक्षिसे मिळू लागली व लोक मला एक डान्सर म्हणून ओळखू लागले. भरतनाट्यम, कथक आणि घुमर हे नृत्याचे प्रकार शिकणे मला खूप आवडायचे. मग मी जाईव्ह, साल्सा नि भाचाथा पण शिकले. जीवन अधिकच सुंदर बनत गेले. मग माझ्या लक्षात आले कि शिक्षण हे कधीच माझे क्षेत्र नव्हते. मी व्हिज्युअल कम्युनिकेशन घेण्याचा निर्णय घेतला आणि त्याच ठिकाणी मला फोटोग्राफीचा शोध लागला. माझ्या आयुष्याला एक नवीन वळण मिळाले. फोटोग्राफीने मला एका संपूर्ण नवीन जगाशी कनेक्ट करण्याची संधी दिली. सर्वात अत्याधुनिक ते खाली जमिनीवर, सर्व गोष्टींपासून नैसर्गिक ते मानवनिर्मित! निखालस विविधता खूप मादक होती. त्या वेळी लाइट अॅण्ड लाइफ अकॅडेमीने मला साद घातली. त्या काळातील माझा प्रत्येक क्षण मी आनंदात घालवला.

आज अजूनही मी विविधतेचा पाठपुरावा करते. माझा व्यवसाय फोटोग्राफी असला तरी मला नृत्य करायला आणि शिकवण्यासाठी वेळ आहे. कालांतराने मला सिनेमॅटोग्राफी मध्ये थोडंफार काम करता येईल आणि थिएटरमध्येही काम करायची संधी मिळेल हि मी आशा करते.

आणि आता मला फोटोग्राफीचे माझे ज्ञान इतरांसोबत शेअर करण्याची आणि LLA ऑनलाईन मार्फत त्यांच्या सर्जनशील क्षमतेचा पर्दाफाश करण्यासाठी ही आश्चर्यकारक संधी आहे. माझा आनंदाचा कप अगदी काठोकाठ भरलेला आहे!

Mihir H

Mihir Hardikar

जर मी माझ्या मर्जीप्रमाणे काही करू शकलो असतो तर मी शु-डिझाईनिंग शिकलो असतो, कारण मी तासंतास माझ्या भावाच्या कॉम्पुटरवर शोध घेण्यात घालवायचो कि शु-डिझाइनर कसे व्हायचे आणि नाईकमध्ये नोकरी कशी मिळवायची. माझ्या शाळेतील काही मित्रांचे आईवडील अजूनही विनोद करतात कि मी त्यांना कसे सांगितले होते कि मला शु-डिझाइनर व्हायचे आहे, कारण त्यांच्यासाठी ते चांभार होण्यासारखेच होते!

माझ्या 12 वीच्या रिजल्टवरून मला कळले कि गणितातील डेरिव्हेटीव्ह आणि परबोल प्रॉब्लेम सोडवण्यापेक्षा जीवशास्त्रातील वनस्पती आणि बेडकांची आकृती काढणे मला जास्त आनंद देते. म्हणून मी कमर्शिअल आर्ट घेतले आणि JJ School of Art,Mumbai ला जॉईन झालो जिथे मी मनभरून चित्रे काढू शकेन. मला माझ्या वरिष्ठांकडून दररोज प्रेरणा मिळत होती आणि मी जाहिरातीच्या विविध क्षेत्रांविषयी माहिती मिळवत होतो. जसे, ऍनिमेशन, इलस्ट्रेशन, एग्झिबिशन डिस्प्ले, फोटोग्राफी इ. मला कल्पना आली की कल्पनाशक्तीपेक्षा जाहिरातीच्या अंमलबजावणी करण्यात मी जास्त उत्सुक आहे.

LLA एक साक्षात्कार होता. शिकलेले विसरणे आणि शिकणे एकाच वेळी. मी मला ज्या असाइन्मेंट्स मिळाल्या त्या सर्व व्यवस्थित पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मी सामग्रीचा रंग, पोत आणि ताजेपणाचा वापर करून जास्तवेळा जेवण बनवायला लागलो. कालांतराने मला जाणवले की फोटोग्राफीच्या इतर क्षेत्रांपेक्षा खाद्यपदार्थ आणि पेय फोटोग्राफीचा मला जास्त आनंद मिळतो आहे.

मी स्थानिक प्रवास करून हळूहळू खाद्य संबंधित प्रकल्प करण्याचा प्रयत्न करत आहे.मला असे वाटते की यासारख्या गोष्टी माझ्या आवडी आणि क्षेत्रफळ, पोट्रेट, तरीही जीवन आणि अन्न फोटोग्राफीचे ज्ञान वापरतात.

बऱ्याच वेळा कलाकारांना भाषेच्या आणि संवाद साधण्याच्या अडचणी येतात. अशा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रादेशिक भाषांमधील LLA ऑनलाईन फोटोग्राफी कार्यक्रमाची खूप मदत होईल. मला खूप आनंद आहे कि मी या प्रकल्पाचा एक भाग आहे.

Monika Adlakha

शब्दांमधील समस्या अशी की जेव्हा प्रत्येकजण बोलणे सुरू करतो, तिथे खरोखर ऐकण्यासाठी कोणीही उरलेले नसते. आणि मला विरामाची आठवण यायला लागली. तो विराम जो तुम्हाला निरीक्षण करू देतो, विचार करू देतो, तुम्हाला संवाद साधू देतो. ह्या विरामातच माझ्या नवीन अवताराची व्याख्या आहे – एक फोटोग्राफर. स्वतःशी कबुली देणारी खवैय्या, सहजतेने लोकांचे निरीक्षण करणारी, मी एक लेखक, फोटोग्राफर आणि एक मुसाफिर!

पंधरा वर्षांपर्यंत मी शब्दांमधून जीवन व्यक्त केले. कधी कधी माध्यम व्यक्ती म्हणून, एक संप्रेषण तज्ञ म्हणून इतर वेळा. हे पुरेसे असले तरी ते नव्हते. जीवनाचे हेतू हा जीवनाचा उद्देश आहे. आणि माझ्या ह्या तृष्णेने मला अपूर्णतेला दाद द्यायला, स्वतःच्या डोळ्यांनी स्पर्श करायला, लपलेले सौंदर्य शोधून काढायला आणि जीवनातील क्षणांना पकडून ठेवायला शिकवले.

माझ्यात असणाऱ्या भटक्या मानवाला धन्यवाद. मी चेहरे आणि ठिकाणे यांच्या पलीकडील जीवन जगेल आणि जे करायची माझी उत्कंठा होती ते मी करेल, जीवनाचे वर्णन करेल – वास्तविक, मूळ आणि अगदी अलीकडील रूपात.

मी Light & Life Academy कडून जे काही घेतले तो अनुभव माझ्याबरोबर आयुष्यभर राहील. आणि मला हे आव्हान, उत्साह, यश आणि हा प्रवास माझ्याबरोबर संपवायचा नाहीए.

LLA ऑनलाईन बरोबर माझा हा सहवास म्हणजे, कल्पनांचा उत्सव, नवीन संकल्पना आणि फोटोग्राफीच्या विविध क्षेत्रामधील प्रेरणादायी संभाषण ह्या सर्वांचा उगम, असायला हवा आहे.

Light & Life ही केवळ एक अकॅडेमी नाही. ती एक शिस्त आहे. इथे, तुम्ही एक उत्सुक प्रेक्षक बनून साक्षीदार होता आणि शिकता – प्रकाश आणि सावलीची अमर्याद जादू!

हे सांगण्याची गरज नाही कि मी अॅकॅडमीशी संबंध जोडण्यासाठी हि आणखी एक अभिमानास्पद संधी आहे, जिने मला घडवले.

म्हणूनच, तुम्ही तुमचा उद्देश शोधायला आणि तुमची आवड जगायला मला सामील व्हा.

Punya Arora

पुन्या अरोरा प्रकृतीने पंजाबी आणि मनाने दक्षिण भारतीय आहे, एक व्यावसायिक फोटोग्राफर,स्व-घोषित बिर्याणी तज्ज्ञ आणि देशातील फार थोड्या महिला स्टॅन्ड-अप कॉमेडीअन्स पैकी एक आहे.

कॉमेडीची त्यांची शैली दररोजच्या जीवनामधील, काही आश्चर्यकारक मजेदार क्षण आणि परिस्थिती आणि काही अॅक्सेंट्स प्रतिबिंबित करते. पुन्याचे हे ठाम मत आहे कि शिकवणे हे शिकण्याचे सर्वात उत्तम स्वरूप आहे आणि LLA ऑनलाईन फोटोग्राफीच्या ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी एक उत्प्रेरक आहे.

त्यांच्या फोटोग्राफीच्या शैलीत लोकांच्या, जमिनीवरील आणि पाण्याच्या खालील, प्रतिमांचा समावेश आहे. पोट्रेट आणि फॅशन शिवाय, त्या, मोकळी जागा, भोजन आणि विवाहसोहळा हि फोटोग्राफी देखील करतात.

एकंदरीत काय तर सतत आनंद आणि सूर्यप्रकाश प्रसारक!

LLA ऑनलाईन चा एक भाग म्हणून पुन्या त्यांच्यासाठी अविभाज्य असे काहीतरी मिळवतात: जगाला परत देणे आणि स्वतःच्या फोटोग्राफीच्या आवडीचा प्रसार करणे !!

Rejoi Krishna

Rejoi Krishna

मध्यमवर्गीय दक्षिण भारतीय कुटुंबातील व्यक्तीसाठी असणारा सर्वसाधारण मार्ग म्हणजे इंजिनिअरिंग किंवा मेडिसिन करायचा माझा हेतू नव्हता. माझी एकच महत्वाकांक्षा होती,PSG Arts & Science College,Coimbatore मधून मानसशास्त्र शिकायचे. मी कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला असताना कॉलेजमध्ये VISCOM हा कोर्स सुरु झाला. व्हीस्कॉम विद्यार्थ्यांशी संवाद साधताना, मला जाणवले की माझी आवड लोकांचे मनोरंजन करणे आहे. मी रेडिओ मिर्चीला आरजे म्हणून सामील झालो. अगदी थोड्याच काळात मी खूप लोकप्रिय झालो. सात वर्षांनंतर मला काहीतरी वेगळं करण्याची इच्छा झाली आणि मी माझी फोटोग्राफीची आवड विकसित करायचे ठरवले.

मी ऐकलेल्या गोष्टी सांगून लोकांचे मनोरंजन करण्याऐवजी मला वाटले मी बघितलेल्या गोष्टी दाखवून मी त्यांचे मनोरंजन करेन.

मी फोटोग्राफीच्या जगात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. Light & Life Academy मध्ये अभ्यास करायचे ठरवले, फोटोग्राफीच्या सर्व पैलूंविषयी आणि तंत्रज्ञानाविषयी शिकून एक व्यावसायिक छायाचित्रकार बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी! हे आश्चर्यकारक होते की कसे एलएलएने मला प्रोत्साहन दिले आणि शिकवले की ज्ञान प्राप्त करण्यासाठी वयाचे बंधन नसते. LLAच्या कृपेने मला बरच इनपुट,ज्ञान आणि प्रोत्साहन मिळाले, आज मी जो काही आहे तो घडलो!

आता मी एक “आर्किटेक्चर, फॅशन, ऑटोमोबाइल आणि ट्रॅव्हल फोटोग्राफर” ह्या माझ्या स्वप्नपूर्ततेत व्यस्त आहे. LLA ऑनलाइन मला इतर फोटोग्राफर्सबरोबर मी जे शिकलो ते शेअर करण्याची संधी देतंय.

Sathish Kumar Raju

सतीश विविध पिढ्यांपासून फोटोग्राफर कुटुंबात वाढले. त्यांच्या पणजोबांनी 1904 मध्ये पॉंडिचेरी येथे ओमनी फोटो स्टुडिओ काढला आणि चालवला. फोटोग्राफीची त्यांची सर्वात पहिली आठवण म्हणजे त्यांनी त्यांच्या वडिलांना खूप मोठ्या आकाराचे प्रिंट घेताना घरी पहिले. त्यांना आठवते कि हे मोठे प्रिंट घराच्या गच्चीवर किंवा मध्यभागी असलेल्या जागेत,म्हणजेच मत्रम मध्ये केले होते. त्यांचे पहिले प्रिंट हे खऱ्या व्यक्तीच्या आकाराचे, एक पोर्ट्रेट होते. जशी प्रतिमा हळूहळू प्रकट झाली तशी जादू वाटत होती आणि त्याचे वडील जादूगार होते. तेव्हापासून सतीश फोटोग्राफीत अडकले ते कायमचे! सतीशने लोयोला कॉलेज, चेन्नई येथून व्हिज्युअल कम्युनिकेशनमध्ये बीएससीचा पर्याय निवडला आणि नंतर फोटोग्राफीची जन्मजात आवड जोपासायची ठरवले. त्यांनी इकबाल मोहम्मद यांच्या पंखाखाली राहून स्वतःची प्रगती करायची ठरवले,त्याचवेळी त्यांनी LLA मध्ये दोन वर्षे कामसुद्धा केले. या काळात त्यांनी औपचारिकपणे फोटोग्राफीचा अभ्यास करण्याचे महत्त्व समजावून घेतले आणि 2006 मध्ये अभ्यासक्रमात सामील होण्याचा निर्णय घेतला. कोर्स पूर्ण झाल्यावर त्यांनी इकबालना विविध शूटसाठी मदत करणे चालू ठेवले. सतीशने या काळात आपल्या अप्रतिम निरीक्षणातून बरेच काही शिकले. केवळ फोटोग्राफीबद्दलच नव्हे तर विविध संस्कृती, अन्न, जीवनशैली, लोक याबद्दल शिकले. यामुळे भारतातील सर्वोत्कृष्ट ऑटोमोबाइल फोटोग्राफरंपैकी एक म्हणून त्यांची सध्याची स्थिती आकारण्यास मदत झाली. लाइट अॅण्ड लाइफ अकादमी पूर्ण वेळ अभ्यासक्रमातही ते एक प्रोफेसर आहेत.

समाजाला परत देण्याकरिता आणि अधिक लोकांना फोटोग्राफी घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी, दोन्ही व्यावसायिक आणि एक छंद म्हणून, सतीशना LLA ऑनलाईन मध्ये मार्गदर्शक होण्यास उत्कंठा आहे. त्याच्या मते, जरी फोटोग्राफीचे ज्ञान ऑनलाईन सहज उपलब्ध असले तरी,व्यावसायिकांकडून मिळालेले अभिप्राय, जो शिकण्याच्या प्रक्रियेतील एक महत्त्वाचा पैलू आहे तो तिथे नाहीए. LLA ऑनलाईन मार्फत हि जागा भरून काढायचा सतीशचा उद्देश आहे.

Shaheen Taha

Shaheen Taha

मी खूप भाग्यवान आहे कि माझे वडील एक व्यावसायिक फोटोग्राफर आहेत. म्हणून 4 थ्या वर्षी मला कॅमेरा देण्यात आला आणि मी फोटो काढण्यास सुरुवात केली मी नंतर कधीही थांबलो नाही. जेव्हा कॉलेजला जायची वेळ आली तेव्हा इंजिनिअरिंग करणे हे त्या दिवसांमध्ये ठरलेलेच असायचे म्हणून मीही त्याच गर्दीचा एक भाग बनलो. पण त्या अभ्यासाच्या काळातील सगळ्यात रोमांचक भाग म्हणजे मी खूप गाड्यांना टिंकरिंग करायचो, गाड्या चालवायचो आणि लोकांना वेडे करायचो. माझी दुसरी आवड म्हणजे संगीत. सायन्समुळे माझी फारच घुसमट व्हायला लागली आणि मी माझ्या वडिलांना पटवून दिले मला सर्जनशील क्षेत्राकडे जाण्याची परवानगी द्या. मी तीन वर्षांचा Wigan & Leigh College मधून ऍडव्हर्टिसिन्ग आणि डिज़ाइनिंग कोर्स पूर्ण केला आणि डिग्री घेतली. ह्या काळात माझी फोटोग्राफीची उत्कटता वाढली आणि मी Light &Life Academyला गेले. माझ्याकडे LLA म्हणजे काय हे सांगण्यासाठी शब्द नाहीत. LLAमुळे माझा फोटोग्राफीबद्दलचा पूर्ण दृष्टिकोनच बदलला.

मला प्रत्येक प्रकारची फोटोग्राफी करणे आवडते. आज, मी मुख्यतः फॅशन फोटोग्राफी, आर्किटेक्चर आणि इंटिरियर फोटोग्राफी आणि मूव्ही प्रोमोमध्ये आहे. पण माझी उत्सुकता आहे ती प्रामाणिकपणे ऑटोमोबाईल फोटोग्राफी करण्याची; पण 3D प्रकारची नाही, जी आजकाल अतिशय लोकप्रिय आहे. मला कॅमेरावर ऑटोमोबाईलची अतिशय सुंदर प्रतिमा घेणे आवडते ज्याला री-टचिंगची आवश्यकता नसते.

मला इतरांच्या कामाचे निरीक्षण करणे आणि विचारांची देवाणघेवाण करणे आवडते. हा खरोखरीच शिकण्याचा एक छान अनुभव आहे म्हणून मी LLA ऑनलाईन कार्यक्रमासाठी मार्गदर्शक होणे मला आवडेल. ज्या लोकांसाठी भाषा एक अडथळा आहे असे अनेक लोक आहेत. त्यांच्याकडे उत्तम प्रतिभा आहे, परंतु बाहेरच्या जगाशी संवाद साधण्यास ते सक्षम नाही. म्हणून ही एक चांगली कल्पना आहे की हा कार्यक्रम 9 भारतीय भाषांमध्ये सादर केला जात आहे. मी खूप आनंदित आहे की आणखी बरेच लोक LLA कुटुंबाचा भाग होऊ शकतात.

Shantanobho Das

फोटोग्राफीचा माझा परिचय माझ्या वडिलांच्या ऑलिंपसद्वारे झाला. मी पहिल्यांदा कॅमेरा हातात धरला आणि व्ह्यूफाइंडरकडे बघितले. ते माझ्यासाठी अतिशय आकर्षक होते.

निळ्या आकाशची चित्रे, विशाल महासागर आणि स्पष्ट पावसावरचे चित्र माझ्या कॅमेऱ्याच्या लेन्समधून अधिक सुंदर दिसत होते. यामुळे फोटोग्राफीमधील माझ्या रूचीला बळकटी मिळाली.

माझ्या बालपणात मला आवडणारी आणखी एक गोष्ट म्हणजे माझ्या आईला स्वयंपाकात मदत करणे.

शाळेनंतर मी वाणिज्य क्षेत्रात पदवीधर झालो पण लक्षात आले की खरंतर चित्रांद्वारे स्वत: ची अभिव्यक्ती करणे हे मला करायचे आहे. मी एक ब्रेक घेतला आणि क्रूज जहाजांवर जगभर प्रवास केला ज्यामुळे मी वेगवेगळ्या विषयांच्या आणि स्थानांच्या प्रतिमा हस्तगत करू शकलो. क्रूझच्या शेवटी मी ठरविले की फोटोग्राफी मला माझ्या उर्वरीत आयुष्यासाठी करायची आहे, ज्याने मला Light & Life Academyला नेले.

त्यातील प्रॅक्टिकल सेशन्स, डेमॉन्स्ट्रेशन्स आणि असाइन्मेंट्स यांनी मला सर्वाधिक आकर्षित केले. त्याचप्रमाणे, माझ्या असाइन्मेंट्स पूर्ण करण्यासाठी मी जेव्हा फिरत होते तेव्हा मला लोकांना आणि निसर्गाला मूळ स्थितीत बघायला मिळाले.

आजकाल, मी माझ्या फोटोग्राफीच्या शोधाबरोबर जेवणाची आवडही जोपासतो. स्वयंपाकाचे प्रयोग करतो आणि ते एकमेकांबरोबर शेअर करतो.

मला हे नेहमीच सत्य पटले आहे की, जेव्हा ज्ञान शेअर केले जाते तेव्हा ते वाढते. इकबाल आणि माझ्या इतर मार्गदर्शकांनी मला जे काही शिकवलं आहे ते शेअर करण्यासाठी एलएलए ऑनलाईननी मला एक प्रचंड व्यासपीठ उपलब्ध केले आहे.

Sukil Tarnas

माझ्या बालपणात, एका पुजाऱ्याच्या, जो आमचा कुटुंबाचा स्नेही पण होता, आयुष्याविषयी फार कुतूहल होते. तो शहरामध्ये त्याच्या (बाईक) वरून फिरायचा आणि त्याच्याभोवती एक प्रकारचे अधिकार आणि सिद्धीचे वलय होते. मग मी स्वतः एक बनण्याचा निर्णय घेतला. तथापि, थोडावेळ शाळेत (शाळेचे नाव ) गेल्यानंतर मला लक्षात आले कि मला हे नाही करायचे आणि मग मी Loyla College,Chennaiमध्ये जायला लागलो. प्रादेशिक माध्यमात माझे शालेय शिक्षण करणे आणि नंतर लोयोला सारख्या हाय-प्रोफाइल महाविद्यालयाच्या खोल अंतराळात फेकून दिल्यामुळे मला खूप असुरक्षित वाटले. माझे सायन्सचे मार्क्स चांगले असल्यामुळे मी केमिस्ट्री घेतले होते पण भाषेच्या अडचणीमुळे मी वर्गात गैरहजर राहू लागलो आणि शक्य असलेल्या इतर सर्व एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीमध्ये भाग घेऊ लागलो. मला सर्वात जास्त रस होता आर्टस् अँड क्राफ्ट्स मध्ये म्हणून मी माझा बहुतेक वेळ हॉस्टेल सजवण्यात आणि कॅम्पसमध्ये विविध विद्यार्थी गटासाठी पोस्टर तयार करण्यात घालवला.

त्यावेळेस, मी वर्ल्ड सोशल फोरममध्ये सामील झालो होतो. त्या काळात ती मोठी गोष्ट होती. आणि जेव्हा एका NGO च्या गटाने हैद्राबादमध्ये एशियन सोशल फोरम सुरु केले, फादर हेन्रीने मला पहिल्यांदा DSLR कॅमेरा आणि चार फिल्म रोल दिले आणि त्या कार्यक्रमाचे दस्तावेज करण्यास सांगितले. मी थोडा भांबावलो पण त्यांनी सांगितले कि शटर 1/125th of a second आणि ISO 100 वर ठेव. मी काहीतरी योग्य केले असले पाहिजे. कारण फादर हेन्रीनी मला त्यांच्या नेतृत्वाखाली घ्यायचे ठरवले आणि मला लॉयला कॉलेजमध्ये व्हिजुअल कम्युनिकेशनला ऍडमिशन दिली. एव्हढेच नाही तर फोटोग्राफीच्या असाइन्मेंट्स देऊन त्यादरम्यानचा माझा खर्च भागवण्यास मदत केली. इथे मी इकबाल सरांना भेटलो आणि त्यांनी मला एलएलएचा एक भाग होण्यासाठी सांगितले.

मी एलएलए मध्ये काम करून सुरुवात केली आणि व्यावसायिक फोटोग्राफी प्रोग्राम केला. इकबाल सर यांच्यासोबत काम करताना औद्योगिक फोटोग्राफीमध्ये रस निर्माण झाला जे मला सर्वाधिक करावेसे वाटते. मला खाद्यपदार्थांना शूट करायला आवडते कारण मी स्वतः एक खवैय्या आहे.

मी एलएलए ऑनलाईन प्रोग्रामचा भाग म्हणून आनंदी आहे कारण हा एक संरचित कार्यक्रम आहे जसा मी केला होता ,ज्याने मला तयार केले आहे! मी आता बर्याच लोकांना समान अनुभव घेण्यास मदत करू शकतो.

Vikram Hingmire

Vikram Hingmire

सृजनशील जागांचे आणि बांधील वातावरणाचे माझे प्रेम माझ्या बालपणीच्या आठवणींमुळे प्रभावित झाले आहे. त्यावेळी मी बघायचो कि माझे वडील एका छोट्याशा रिकाम्या जमिनीवर घराची कल्पना करायचे आणि त्यावर विविध प्रकारच्या वनस्पती लावायचे आणि माझ्या आईने जमवलेली इंटिरियर डेकोरेशनची मासिके आणि कात्रणे हे माझ्या लँडस्केप आर्किटेक्चरच्या आकर्षणाचे कारण असावे. आशा होती कि कधीतरी मी ह्या प्रतिमा खऱ्याखुऱ्या किंवा अस्तित्वात आणू शकेल. वैद्यकीय व्यवसाय हि जरी पार्श्वभूमी होती तरी, माझी सर्जनशीलता, हि मी बनवलेल्या जेवणातून, मी दरवेळी केलेल्या फर्निचरच्या नवनवीन मांडणीतून, आमच्या घरातील शोभेच्या अनेक वनस्पतीनांधून आणि घराच्या भिंतींवर असणाऱ्या पेंटिंग्जवरून, अगदी स्पष्ट होती. लँडस्केप आर्किटेक्चरमुळे, मला निसर्ग आणि कलेची सांगड घालून माझी डिझाइन्स साकारता आली.

परंतु, अविरत अंतिम मुदतींनी माझ्यातल्या उत्कटतेला दूर केले आणि माझ्या सर्जनशीलतेवर तणावाचे वर्चस्व आले. मला असा एक उपाय आवश्यक होता, जो मला माझ्या मूळ घटकांकडे आणेल आणि मला तणावमुक्त करेल. शेवटी मला उपाय सापडला फोटोग्राफीत, अगदी ध्यानास बसण्यासारखे काम केले. अनुभवांचे दस्तऐवजीकरण आणि शब्दांशिवाय कथेचे कथन करण्याची क्षमता, ह्यांनी मला आकर्षित केले आणि माझ्या लक्षात आले कि मी काढलेल्या प्रतिमांमध्ये माझ्या मनःस्थितीचे प्रतिबिंब होते. फोटोग्राफीने माझ्या निरनिराळ्या रचनांची प्रशंसा करणाऱ्या एका फ्रेमचे काम केले, जी सुटसुटीत, नीटस आणि जास्त प्रभावी होती. आता मी लँडस्केप आणि आर्किटेक्चरचा शोध घेतो आणि दाद देतो, ज्यांच्या द्वारे मी माझ्या मनातील कथा पुन्हा सांगू शकतो.

Light and Life Academy ह्या तत्वज्ञानावर चालते कि फोटोग्राफी शिकवणे हि एक कला आहे आणि इथे कल्पनाशक्ती वास्तवात आणण्यासाठी सातत्याने सर्जनशील दिशा दाखवली जाते. इंटरनेटच्या जागतिकीकरण शक्तीचा वापर करून, LLA ऑनलाईन आता दहा वेगवेगळ्या भाषांमधून इच्छुक कलावंत आणि फोटोग्राफर्सपर्यंत पोहोचू शकेल. ह्यामुळे,विविध पार्श्वभूमीच्या लोकांना हि माहिती सहज उपलब्ध होईल आणि त्यांच्यामध्ये एकजूट समाजाची तसेच संभाव्य संवादाची जाणीव शक्य होईल.